
अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता
तुम्ही जर फेसबुकवर ‘कपल चँलेज’च्या नावाखाली छायाचित्र अपलोड करीत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या छायाचित्र मॉर्फ होण्याची शक्यता असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
फेसबुकवर मागील काही दिवसांपासून कपल चँलेजच्या नावाखाली दाम्पत्यांकडून छायाचित्रे अपलोड केली जात आहेत.त्यामध्ये उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिक पत्नीसोबतचे छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक ट्विट करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com