
वेताळबांबर्डे-तेलीवाडी येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना डोंगराचा धोकादायक भाग कोसळला.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळबांबर्डे-तेलीवाडी येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना तेथील डोंगराचा धोकादायक भाग अचानक कोसळला. त्यावेळी महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचे पाच ते सहा कामगार काम करीत होते. दरड कोसळत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने हे कामगार बाजुला पळाले यामुळे सुदैवाने दुर्घटना टळली.
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत वेताळबांबर्डे – तेलीवाडी येथे महामार्गालगत डोंगराची खोदाई करून तेथे नवीन चौपदरी रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्यालगत डोंगराचा भाग धोकादायक बनला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे नवीन चौपदरी रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम महामार्ग ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीमार्फत सुरू आहे.
www.konkantoday.com