
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले
रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव- कोठारवाडी येथील राजेंद्र लक्षण कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला भक्ष्याच्या पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा. असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा बिबट्या साधारण अडीच वर्षाचा असून ती मादी बिबट्या आहे. त्यानी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे सगळे पिंजरे मेर्वी येथे बिबट्या पकडण्यासाठी लावण्यात आले असल्याने बिबट्याला काढण्यास विलंब झाला. तोपर्यंत तराफा सोडून बिबट्याला सुमारे पाच तास आसरा देण्यात आला होता. पिंजरा आणल्यानंतर बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले
www.konkantoday.com