रत्नागिरीत माळ नाका येथील एसटी आगारात पंप सुरू होणार
अपुऱ्या भारमानासह विविध कारणांमुळे तोट्यात असलेल्या एसटीला ऊर्जितावस्था आणणण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातून, एसटी महामंडळ स्वतःच्या जागेमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसचे किरकोळ विक्री केंद्र उभारणार आहे. इंडियन ऑल कॉर्पोरेशनच्या सहभागातून हे पेट्रोल पंप राज्यभरात उभारण्यात येणार असून त्यामध्ये राजापूर आणि रत्नागिरी आगारांचा समावेश आहे
रत्नागिरीत माळ नाका येथील एसटी आगारात पंप सुरू होईल. राजापूरच्या पंपासाठी आगारालगत महामार्गावर आगारप्रमुखांच्या बंगल्याच्या परिसरातील जागेची नुकतीच पाहणी करण्यात आल्याची माहिती राजापूरचे आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली.
www.konkantoday.com