
होमगार्ड कर्मचार्याची गळफास घेवून आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव-फडसवाडी येथे होमगार्ड कर्मचार्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश राजाराम पाडावे (२५, रा. कापडगांव फणसवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
प्रथमेश पाडावे याच्या लग्नाला १ वर्ष २ महिने झाले होते. रविवारी कोणत्यातरी अज्ञात कारणाने होमगार्ड प्रथमेश याने घरातील बेडरूच्या वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
www.konkantoday.com