
मंडणगड तालुक्यातील स्थानिक कलाकारांनी गांभीर्य ही शॉर्ट फिल्म निर्माण केली
कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहरातून गावात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने बनविलेल्या “गांभीर्य’ या शॉर्ट फिल्मने कोरोनाचे गांभीर्य बिंबवण्याचे काम केले आहे. मंडणगड तालुक्यातील स्थानिक कलाकारांनी ही शॉर्ट फिल्म निर्माण केली असून, सोवेली गावात तिचे चित्रीकरण केले. या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होतेय.
ध्रुवतारा क्रिएटर्स आणि एन. डी. प्रोडक्शन प्रस्तुत “गांभीर्य’ शॉर्ट फिल्मचे संकलन, लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत नाचणेकर यांचे आहे. डी. ओ. पी. मितेश गायकवाड तर एडिटर नदीम देवळेकर हे आहेत. आनंदी नागरगोजे, पंकज चव्हाण, राज सुगदरे आणि दत्तप्रसाद गांगण या स्थानिक कलाकारांनी काम केले असून, आपल्या अभिनयाने सामाजिक प्रबोधन केले आहे.सोवेलीचे सरपंच सुरेश दळवी, संपत शिंदे, राहुल साळवी, प्रथमेश घोसाळकर, बालाजी नागरगोजे, हृतिक कदम यांचे सहकार्य लाभले आहे.
www.konkantoday.com