
रत्नागिरी शहरासाठी दांडेआडम येथे अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारणार
रत्नागिरी शहराची पुढील काही वर्षात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील तीस वर्षांचा विचार करून दांडे आडम येथे रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने पंधरा कोटी रुपये खर्चून घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प अत्याधुनिक असणार असून त्यामध्ये शंभर टक्के प्रक्रिया होणार आहे या प्रकल्पातून बायोगॅस खतप्रकल्प विज प्रकल्प मैला प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यात येणार असून हा प्रकल्प प्रदूषणविरहित असणार आहे त्यामुळे शहरातील कचऱ्याची मोठी समस्या मार्गी लागू शकणार आहे लवकरच याबाबत प्रस्ताव केला जाणार आहे
www.konkantoday.com