चिपळूण पोलिसांनी आता ‘सिटीझन पोर्टल’ आणले , घरबसल्या तक्रार करता येणार
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना पोलीस स्थानकात जाऊन तक्रार करता येत नाही, त्यामुळे चिपळूण पोलिसांनी आता ‘सिटीझन पोर्टल’ आणले असून घरबसल्या आपल्याला तक्रार करता येणार आहे. शिवाय वाहन परवाना, पॅन कार्ड, मोबाईल, शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यानंतरच्या तक्रारींसाठी नागरिकांना पोलीस स्थानकाची पायरी चढावी लागणार नाही. चिपळूण पोलिसांनी हरवलेल्या वस्तू, कागदपत्रांची तक्रार देण्यासाठी लिंक सुरू करण्याचा निर्णय घेतला घेतला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली.
www.konkantoday.com