शिवसेनेच्या नादाला लागाल, तर तुम्हीच संपून जाल- शिवसेना रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्माण केलेले शिवसेना एक अस्त्र आहे. ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, तेच संपले. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शिवसेनेच्या नादाला लागाल, तर तुम्हीच संपून जाल, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिले.
भाजपचे सिंधुदुर्गाचे नेते माजी आमदारप्रमोद जठार यांनी शिवसेना संपेल, शिवसेना सत्तेतून उतरेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसूचना काढली जाईल, असे वक्तव्य केले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button