चिपळूण आगारातून लोेटेतील कर्मचार्यांसाठी एसटी बसेस सुरू
लोटे औद्योगिक वसाहतीतील कर्मचार्यांना गेल्या काही दिववसांपासून भेडसावणारा प्रश्न आ. भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी आणि चिपळूण-नोसील या बसेस सुरू केल्या आहेत. कंपन्यांच्या तीन शिफ्टनुसार या गाड्यांच्या फेर्या धावणार आहेत.
लॉकडावुन उठविण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र उद्योग-व्यवसाय, कारखाने सुरू करण्यास तसेच त्यानंतर काही दिवसांनी प्रमुख मार्गावर एसटीच्या गाड्याही सोडण्यास सरकारने परवानगी दिली. त्यानुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानेही सुरू झाले. परंतु चिपळूण किंवा शेल्डी, गुणदे व परिसरातल कर्मचारी व कामगारांना कंपनीत पोहोचण्यासाठी एसटी बस नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती.
www.konkantoday.com