सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातून प्रत्येकी दोन प्रस्ताव आले आहेत. किमान पाच प्रस्ताव तालुक्यातून येणे अपेक्षित होते. प्राप्त प्रस्तावात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र प्रस्ताव नाहीत. त्यामुळे या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार नाहीत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली. आदर्श शिक्षक पुरस्कार योजना जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिक्षक पुरस्कार न मिळण्याची घटना घडली आहे.
www.konkantoday.com