
समुद्रकिनार्यांवर उभारणार पर्यटक सुविधा केंद्रे
समुद्रकिनार्यावर प्रसाधनगृह, न्हाणीघर, कपडे बदलण्यासाठी खोल्या आदी व्यवस्था नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. विशेषतः महिलांना समुद्र स्नानाचा आनंद लुटता येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्रांना मंजुरी दिली आहे, अशा सुविधा केंद्रांसाठी समुद्रकिनार्यांच्या प्रवेशद्वाराजवळ निश्चित क्षेत्र राखून ठेवले जाणार आहे.
राज्यातील बहुतांश समुद्रकिनार्यांवर कपडे बदलण्याची व्यवस्था नाही. त्यामुळ पर्यटकांना समुद्रस्नानानंतर गोड्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी हॉटेल गाठावे लागते. त्यामुळे अनेक पर्यटकांकडून समुद्रकिनार्यावरच आंघोळीची व्यवस्था व्हावी, अशी मागणी होत होती. मात्र त्याबाबतचे धोरण निश्तिच झाले नव्हते. आता पर्यटन मंत्रालयाने या संदर्भातील धोरण निश्चित केले आहे.
www.konkantoday.com