रेल्वे खुली केली तर प्रादुर्भाव वाढेल-परिवहन मंत्री अनिल परब
ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेच्या झालेल्या सविनय कायदेभंग आदोलनावर केली . मुंबईतील अनेक ठिकाणी मनसेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली
ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या. सर्व गोष्टींची काळजी करुन रेल्वे खुली करावी लागते. आधीच प्रादुर्भाव वाढतोय, रेल्वे खुली केली तर प्रादुर्भाव वाढेल. टप्प्या टप्प्याने आम्ही खुल्या करतोय, आता रेल्वेच्या फेर्या वाढवल्या आहेत, असं अनिल परब म्हणाले.
www.konkantoday.com