
लोखंडी हुकाने सुपारी काढताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील चिखली बौद्धवाडी येथे पोफळीच्या झाडावरील सुपारी लोखंडी हुकाच्या साह्याने काढण्याच्या प्रयत्नात लोखंडी पाईप व हुकाचा विज वाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागल्याने वसंत लक्ष्मण कानसे या प्रौढाचा मृत्यू झाला.यातील वसंत कानसे हे आपल्या सहकाऱ्यांसह घरात पेंटिंग चे काम करीत होते त्यावेळी वसंत कानसे हे लघवीसाठी बाहेर गेले असता शेजारच्या कम्पाऊंडमधील पोकळीच्या झाडावर सुपार्या दिसल्या त्या काढण्यासाठी त्यांनी लोखंडी पाइपला हूक लावून त्या काढत असताना लोखंडी पाइप व हुकाचा स्पर्श वीज मंडळाच्या अकरा केवी लाईनच्या तारांना झाला त्यामुळे वसंत कानसे यांना जोरदार शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत गुहागर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे
www.konkantoday.com