
अलोरे पोलीसांनी “अवैध जनावरांची वाहतूक” करणारा ट्रक पकडला.
दिनांक 22/01/2025 रोजी 00.45 वा. कराड-चिपळूण महा मार्गावर असणाऱ्या कुंभार्ली चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान एक वाहन अवैध गुरांची वाहतूक करणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने तेथील पोलीस अंमलदार यांनी येणार्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली व त्या दरम्यान एक अशोक लेलंड ट्रक क्रमांक MH-50-4480 हा चिपळूण – कराड कडे जात असताना त्याचा संशय आल्याने वाहनाला थांबवून त्यामधील चालकाकडे चौकशी करण्यात आली व गाडीच्या हौद्या मध्ये पहिले असता हौद्या मधून दाटी वाटीने व आखुड दोरीने बांधून ठेवलेली एकूण २२ जनावरे भरलेली दिसली.
या जनावरांचा जागीच दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे तसेच आलोरे पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ०३/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण १९७६ चे कलम ५(ए)(१),९ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१), (घ), (ङ), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व मो.वा.का. कलम ६६ / १९२ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व गुन्ह्यामधील वाहन जप्त करण्यात आलेले आहे व या गुन्ह्यामधील चालक शहाजी शंकर नलवडे वय- 52 वर्ष रा -जखीनवाडी कृष्णा हाँस्पीटल शेजारी ता कराड जिल्हा सातारा यास अटक करण्यात आलेली आहे तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
मा. न्यायालय चिपळूण यांच्याकडे त्यास हजार केले असता त्यास १ दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे व इतर ३ आरोपी यांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.या गुन्ह्यातील मिळून आलेली २२ जनावरांपैकी एकही जनावर दगावलेले नाही व सर्व जनावरे सुरक्षित रित्या गोशाळेमध्ये सुरक्षित व योग्य रखवाली मध्ये ठेवण्यात आलेली आहेत तसेच सर्व जनावरांची पशु वैद्यकीय अधिकारी चिपळूण यांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे.