जिल्ह्यातील ३८० अंशकालीन स्त्री परिचर सहा महिने मानधनापासून वंचित
रत्नागिरी जिल्ह्यातील ३८० अंशकालीन स्त्री परिचर मार्च महिन्यांपासून प्रोत्साहनपर मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने हक्काचे मानधन देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी आरोग्य विभागामार्फत जाहीर केलेले सर्व उपक्रम, मोहिमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती. ऑगस्ट महिन्यापर्यंत त्यांना हक्काचे मानधन मिळालेले नाही.
www.konkantoday.com