
भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी मो ॲपद्वारे त्यांच्या पक्षाला (भाजप) 2000 रुपयांची देणगी दिली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल (दि.2) 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यानंतर आता पक्षाने देणगी अभियानाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपद्वारे देणगीला सुरुवात केली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नमो अॅपद्वारे देणगी अभिया सुरू केले आहे. याद्वारे भाजप समर्थक आपल्या मनाने पक्षाला देणगी देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नमो ॲपद्वारे त्यांच्या पक्षाला (भाजप) 2000 रुपयांची देणगी दिली. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करुन ही माहिती दिली आणि देणगी दिलेला स्क्रीनशॉटही शेअर केला.या फोटोसोबत पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना पैसे दान करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, ‘मला पक्षासाठी योगदान देण्यात आनंद होत आहे. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या. नमो ॲपद्वारे देणगी देऊन भारताच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो.’www.konkantoday.com