
कोरोनामुळे हापूसवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग, छोटी युनिटस अडचणीत
हापूस प्रक्रिया उद्योग जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग असून त्यावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत आमरस वर्षाच्या बारा महिनेही आपण खाऊ शकतो यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगातून आमरससह आंबावडी व विविध पदार्थ तयार केले जातात हे पदार्थ देशासह जगातील अनेक देशात पोहचतात. या उद्योगावरही कोरोनामुळे संकट कोसळले आहे. हापूसवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग, छोटी युनिटस बंद आहेत. मालाला मागणी नाही. त्यामुळे काही युनिटमध्ये तयार झालेला आमरस पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यासह कोकणच्या अर्थ व्यवस्थेला चालना देणारे हापूसचे प्रक्रिया उद्योग पुन्हा उभे करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com