
आरोग्य पथकाबरोबर चौकशीसाठी गेलेल्या ग्राम कृती दलाच्या सदस्याला मारहाण
खेड तालुक्यातील मनवल वाडी येथे मुंबईतून आलेल्या एकाच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी गेलेल्या राजेंद्र सौंदरे राहणार मन वलवाडी या ग्रामकृती दल सदस्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून संतोष मनवल व संदेश मनवल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जांभूरडे गावातील राजाराम मादलेकर यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या घरी कोणी आजारी आहे का या तपासणीसाठी आरोग्य सेविका व ग्राम कृती दलाचे सदस्य राजेंद्र सौंदरे हे गावात फिरत होते त्यावेळी संतोष मनवल हा आजारी असून तो मुंबईहून आल्याचे कळले म्हणून आरोग्य सेविके सह फिर्यादी राजेंद्र हे आरोपी संतोष यांच्या घरी गेले असता आरोपी याने शिवीगाळ करून तुम्ही येथे का आला असे विचारले त्यावेळी आरोग्य सेविकेने तुम्ही मुंबई येथून आला आहात व आजारी आहात असे समजले म्हणून चौकशीसाठी आलो आहोत असे सांगितले परंतु आरोपीने काहीही ऐकून घेण्यास नकार दिला त्यामुळे फिर्यादी व आरोग्य सेविका परत जात असताना आरोपीने पाठिमागुन येउन काठी घेऊन फिर्यादी राजेंद्र यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली याबाबत खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com