सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा संकुलात 100 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेला कोव्हिडचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालयांची परवानगी देण्यात येत आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे 100 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कोव्हिड रुग्णालयाची मागणी केली होती.
www.konkantoday.com