नूतन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे आज रविवारी आपला पदभार स्वीकाणार
मणिपूर राज्यात सेवा बजावताना व त्यानंतर महाराष्ट्रात गडचिरोली येथे बजावलेल्या सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे पदक दोनवेळा मिळवणारे जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे आज रविवारी आपला पदभार स्वीकाणार आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या जागी गडचिरोली येथून ते बढतीवर रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीमध्ये येणारे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग हे एमबीबीएस झालेले आहेत. पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील ते मुळचे राहणार आहेत. २०१४ च्या बॅचमधील आयपीएस असून पहिली पोस्टिंग त्यांची मणिपूरला झालेली होती. तेथेही त्यांनी उत्कृष्ट कामनिवडणुकीच्या काळामध्ये शांतता राखण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांना तेथील पोलिस महासंचालकाकडून पदक बहाल करण्यात आले होते.
जून २०१८मध्ये ते महाराष्ट्र केडरला आले. जुलैमध्ये त्याची नियुक्ती गडचिरोली येथे झाली होते. दोन वर्षे ते गडचिरोलीला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पहात होते. गुप्तवार्ता विभागात त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पोलिस महासंचालकाकडून पदक देऊन गौरविण्यात आले होते. डॉ. गर्ग हे रविवारी आपल्या पदाचा कारभार स्वीकारणार आहेत.
www.konkantoday.com