दापोली मंडणगड येथील कोरोनाबाधितांना दापोली उपजिल्हा रुग्णालयातच चांगल्या प्रकारचे उपचार मिळणार – आमदार योगेश कदम

खेड : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे संकट आणखीनच गडद होताना दिसत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत मात्र रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाची लढाई लढण्यासाठी खेड दापोली आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यात आरोग्य आणि शासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत आहेत. लोकप्रतिनीतही म्हणून मी संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाबाधितांना चांगली सेवा, औषधोपचार यासाठी यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना कोणतीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी केले आहे. खेड आणि दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
खेड येथील कळंबणी आणि दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयांना भेट देऊन आमदार योगेश कदम यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना वैद्यकिय अधिकारी, किंवा अन्य स्टाफ यांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत याची पूर्ण माहिती घेऊन त्यावर काय उपाय योजना करता येईल याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या भीतीने सर्वसामान्य जनता हादरून गेली असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी धीर देणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तात्काळ आणि योग्य ते उपचार देण्यात यावेत, आवश्यक ती औषधें, इंजेकशन्स, पुरविण्यात प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर शासकीय रुग्णालयातच उपचार व्हायला हवेत. एकाही रुग्णावर पेड रुग्णालयात जाण्याची वेळ येत काम नये असे कदम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बजावले.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेड्स कमी पडत असतील तर बेड्स वाढवून दिले जातील, व्हेंटीलेटर्स, आयसीयू जे काही हवे असेल ती सारी तजवीज केली जाईल. येत्या पंधरा दिवसात आणखी ३० बेड्स वाढविण्यात येतील मात्र रुग्णांची हेळसांड होणार नाही याची दक्षता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी . दापोली कोविड सेंटरमध्ये सध्या १३० रुग्ण ठेवण्याची क्षमता आहे. ती आणखी ५० ने वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली. या इमारतीत आवश्यक असलेले साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना आमदार कदम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती फुले यांना केल्या.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात डॉ भगत आणि त्यांचे सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्याने दापोलीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. डॉ भगत आणि त्यांच्या सहकारी करत असलेल्या या कामाचे आमदार कदम यांनी कौतुकही केले. यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, नगराध्यक्ष शेख, माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, निलेश शेठ उन्मेष राजे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button