जिल्ह्यातील ७२ डॉक्टर आणि काही परिचारिका चार महिने पगाराविना
कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्यात टाकून राष्ट्रीय आपत्तीला तोंड देणारे डॉक्टर सध्या वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत. ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले डॉक्टर कोविड योद्धा म्हणून लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड योद्ध्यांना सुविधा व वेतन वेळेवर द्या, असे आदेश शासनाला दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील ७२ डॉक्टर आणि काही परिचारिका चार महिने पगाराविना आहेत. त्यामुळे या योद्ध्यांची मानसिकता ढासळू लागली असून, शासनाने दखल घेण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com