चिपळूण शहरातील ४९३ इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा
चिपळूण शहरातील ४९३ बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात पालिकेत देण्याची नोटीस मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी बजावली आहे. पालिकेच्या परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून हे ऑडिट करून अहवाल पालिका प्रशासनाकडे पाठवावा, असे नमूद करण्यात आले आहे.
www.konkantoday.com