
संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अंबर अलर्ट जारी केला असून समुद्रातील वारेही वेगाने वाहणार आहेत. दरम्यान, मुंबईत आज सकाळी पावसाच्या हकल्या सरी पडल्यामुळे तापमान २ ते ३ अंशांनी घसरले आहे.
www.konkantoday.com