
खलाशांच्या समस्येमुळे पर्ससीन मासेमारी पुन्हा संकटात
तांत्रिक कारणामुळे मागणीनुसार खलाशांची उपलब्धता न झाल्याने पर्ससीन मासेमारी पुन्हा संकटात सापडली आहे. ट्रॉलिंग, गिलनेटप्रमाणे पर्ससीन मासेमारी संकटात सापडल्याने मिरकरवाडा बंदरात नौका फक्त उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
कोविडच्या संकटामुळे यंदा नेपाळच्या खलाशांना काही अडथळे निर्माण झाले आहेत. एका बोटीवर २५ ते ३७ खलाशी कार्यरत असतात. पर्ससीन नेट नौकांवर सुमारे ८ हजार खलाशांची आवश्यकता असते. दरमहा खलाशांवर १० हजार रुपये किमान खर्च करण्यात येतो. खलाशांची उपलब्धता झाली तरच पर्ससीन नेट मासेमारी रत्नागिरी, राजापूर तालुक्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com