
क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपणार आजपासून आयपीएल
अखेर आज क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. जवळपास गेले सहा महिने करोना विषाणू संसर्गाच्या साथीने जगातील सर्वच देशांना मेटाकुटीला आणले आहे. करोनाच्या कहरामुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा खचलेल्या क्रिकेटरसिकांना थोडा दिलासा व उभारी मिळेल अशी आशा केली जात आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
www.konkantoday.com