
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कराड रोड वर भीषण अपघात , थार गाडीची रिक्षा व ट्रक ला धडक पाच जण ठार
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कराड रोड वर वशिष्ठ डेअरी पिंपरी खुर्द जवळ काल रात्री तीन वाहनांच्यात भीषण अपघात झाला असून अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.परराज्यातील पासिंग असलेली थार गाडीने रिक्षा आणि ट्रक यांच्यात पिंपळी येथे हा अपघात झाला.थार चालकाने रिक्षा आणि ट्रकला ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे
अपघाताची भीषणता इतकी होती की जागीच चार जण ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला
या अपघातात मृत्तांमध्ये रिक्षातील चार जण त र थार चालकाचा समावेश आहे
थार चालकाने रिक्षाला पाठीमागून धडक दिली
सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या धुके आणि मुसळधार पाऊस यामुळे वाहने दिसली नसल्यामुळे मोठा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.