पैशाच्या मोह पडला आणि खुनाचा प्लॅन रचला बँक मॅनेजर च्या खून प्रकरणी
सराफासह एकाला अटक

गुहागर वेलदुर येथील विदर्भ कोकण बँकेच्या महिला मॅनेजर सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या १२ तासांत पोलीसांना यश आले आहे. संजय श्रीधर फुणगुसकर (वय ४०) व सत्यजित बबन पटेकर (वय ३२) दोघेही रा. नवानगर अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री १.३०वा. त्यांना अटक करण्यात आली. आज (ता. १८) आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने संजय फुणगुसकरला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसऱ्या आरोपीची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे. बँकेच्या महिला शाखाधिकाऱ्यांच्या खुनाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी गुहागरमधील पोलीसांना सोबत घेऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. , सौ. सुनेत्रा यांच्या मोबाईल सीडीआरचे विश्लेषण करण्यात आले. नातेवाईकांकडून माहिती घेण्यात आली. त्यावरुन सौ. सुनेत्रा यांनी संजय श्रीधर फुणगुसकर यांच्यासोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय फुणगुसकर यांच्या मोबाईल सीडीआरचेही विश्र्लेषण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरवात झाली. त्यावेळी पोलीसांनी संकलीत केलेली माहिती व संजय फुणगुसकर सांगत असलेल्या गोष्टींमध्ये तफावत आढळून आली. अखेर पोलीसी खाक्या दाखवल्यावर संजय श्रीधर फुणगुसकर यांनी सत्यजित बबन पटेकर याला सोबत घेऊन पैशांसाठी सौ. सुनेत्राचा खून केल्याचे सांगितले. संजय फुणगुसकर हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरमध्ये सराफाचे काम करत होता. सौ. सुनेत्रा यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये आणलेले होते. सदर पैशांच्या हव्यासापोटी संजय फुणगुसकर आणि सत्यजित बबन पटेकर यांनी सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा गळा आवळून खून केला. प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मयताला वेलदूर नवानगर तरी जेट्टी येथे आणून मयताच्या पायाला व कमरेला रस्सी बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून जेट्टीसमोर दाभोळ खाडीत ढकलून देण्यात आले. हा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना गुरुवार दि. १७ रात्री १.३१वा. अटक करण्यात आली आहे.या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका होती. तपास पथकात गुन्ह्याचे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक किरणकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संतोष साळसकर, संतोष माने, वैभव चौगुल, हेमलता कदम, आदीनाथ आदवडे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, अरुण चाळके, गुरु महाडिक, रमीझ शेख, पोलीस उपविभागीय कार्यालयातील मिलिंद चव्हाण, इम्रान शेख, मनोज कुळे यांचा समावेश होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button