दसपटीतील जागा निश्चित केलेले दोन टॉवरचे प्रस्ताव बीएसएनएलकडे धुळ खात पडले, ग्राहकांच्या नाराजी
चिपळूण तालुक्यातील दसपटीतील आकले येथे बीएसएनएलचा एकमेव टॉवर आहे. मात्र त्याचीही रेंज मिळत नाही. त्यामुळे संपर्काबरोबरच ऑनलाईन व्यवहार ठप्प होतात शिवाय विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या विभागात नवीन दोन मोबाईल टॉवरसाठी प्रयत्न सुरू आहेत. बीएसएनएलच्या अधिकार्यांनी सर्व्हे करून जागाही निश्चित केली. मात्र पुढील कार्यवाही रखडल्याने ते दोन्ही प्रस्ताव कार्यालयातच धूळ खात पडले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबत लवकरच खा. विनायक राऊत यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती पं. स. शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे यांनी दिली.
www.konkantoday.com