जिल्ह्यातील सेतू कार्यालय बंद, ऑनलाईन दाखले नागरिकांना त्वरित द्या -डॉ. विनय नातू

रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर अनेक सेतू कार्यालये बंद आहेत. गुहागर, चिपळूण येथील सेतू कार्यालये बंद असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व सेतू कार्यालये व आपले सरकार सेवा केंद्रे, नियमित सुरू राहतील व शासनाने विविध दाखल्यांची जी दिवस मर्यादा ठरवून दिली आहे त्या दिवस मर्यादेतच सर्व नागरिकांना दाखले मिळाले पाहिजेत. यापुढील काळात नागरिकांना वेळेवर दाखले न मिळाल्यास आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी कोकण आयुक्तांना दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button