गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा महिला
बँक मॅनजर खून प्रकरण;
नवानगरमधील दोघे पोलिसांच्या ताब्यात?

गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरच्या महिला मॅनेजरचा मृतदेह गुरुवारी दाभोळ खाडीत सापडला होता. सुनेत्रा दुर्गुळे असे या महिलेचे नाव असून त्या चिपळूण येथील रहिवासी आहेत. गुरुवारी सकाळी दाभोळ खाडीतील नवानगर परिसरात त्यांचा मृतदेह खाडीत तरंगत असताना दिसला होता त्यांच्या मृतदेहाला दोरीने मोठे दगड बांधलेले होते त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. गुहागर पोलिसांचा या खुनाचा यशस्वी तपास केला असून नवनगर गावातील दोन मारेकरी या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहेत. यामुळे या खुनाचे गूढ लवकरच उलगडेल. पैशासाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्गुळे यानी सोने खरेदी करण्यासाठी काही लाख रुपये रक्कम काढली होती त्यातून हा खुनाचा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस तपासात ते लवकरच स्पष्ट होईल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button