ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून रेशन दुकानदारांचा संप स्थगित
रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार केरोसिन चालक-मालक संघटनेने रेशन दुकानदार व ग्राहकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच रेशन दुकानदारांच्या काही मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संप पुकारला होता. या संपाला बर्यापैकी यश आले होते. तर ग्राहकांची आणखी गैरसोय होवू नये या दृष्टीने आम्ही संप स्थगित करीत आहोत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार, केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे पुन्हा एकदा रेशन कार्डधारकांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
www.konkantoday.com