
लांजा येथे घरातून ९६ हजाराचे दागिन्याची चोरी, संशयित महिलेविरूद्ध गुन्हा दाखल
लांजा येथील संतोष रामदास चाळके यांच्या घरात कपाटात ठेवलेल्या ९६ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत संशयित म्हणून वासंती दहिबावकर हिच्या विरोधात व अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा टी.बी. चाळ येथे राहणारे संतोष चाळके यांचेकडे यातील संशयित वासंती दहिबावकर, रा. राजापूर या रहायला आल्या होत्या. दरम्याने चाळके यांच्या घरातील किचनमध्ये कपाटात डब्यात ठेवलेले ९६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. ही चोरी संशयित महिलेने किंवा अज्ञाताने केली असावी अशी फिर्याद फिर्यादी चाळके यांनी लांजा पोलिसात केल्याने पोलिसांनी संशयित महिला दहिबावकर हिचे व अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
www.konkantoday.com