
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल–,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी चर्चा केली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली. आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं
www.konkantoday.com