
शंभर फूट उंचीवरील राष्ट्रध्वजाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सर्व भारतीयांचा अभिमान असलेल्या शंभर फूट उंचावरील राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,आमदार राजन साळवी,जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शंभर फूट उंचीवरील राष्ट्रध्वज उभारण्याची कल्पना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे कडे मांडली.ही कल्पना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी उचलून धरली हा ध्वजस्तंभ उभारणे व या परिसराचा सुशोभिकरण करण्यासाठी नियोजन समितीमधून ७०लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. शेवटी या संकल्पनेला मूर्तरूप आले व भारतीयांच्या अभिमान असलेला तिरंगा आज शंभर फुटावर फडकला आणि रत्नागिरीकरांची छाती गर्वाने फुलून आली.हा राष्ट्रध्वज डीके फौंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे.सामाजिक बांधिलकीतून 4 वर्षा पुर्वी मुंबई येथे डी के फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली होती,आपला राष्ट्रधव्ज सतत उंच उंच फडकत राहावा याचा ध्यास घेऊन हा उपक्रम राबवून ऐक नवा संकल्प समाजा समोर ठेवण्याचा ते संकल्प करीत आहेत.आता पर्यंत त्यानी महाराष्ट्रात 6 ठिकाणी 100 फुटा पेक्षा जास्त उंची वरती राष्ट्रधव्ज उभारण्याचे काम केले आहे.(1) राजभवन मुंबई -150 फुट(2)मुंबई विद्यापीठ -150 फुट(3) हजर हाऊस मुंबई-350 फुट(4)ठाणे माजिवडा-100 फुट,(5)एन,डी स्टुडिओ,कर्जत-100 फुट(6)अबंरनाथ-100 फुट (7)रत्नागिरी जिल्हाधिकारी आवार-100-फुट उभारण्यात आला असून रत्नागिरी येथे राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोठा पाठपुरावा केला.
www.konkantoday.com