
नवे संसद भवन बांधण्याची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला
नवे संसद भवन बांधण्याची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला मिळाली आहे. या प्रकल्पासाठी ८६१.९० कोटी रुपये खर्च येणार असून २१ महिन्यात नवे संसद भवन बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. केंद्रीय बांधकाम विभाग सीपीडब्ल्यूडीने नवे संसद भवन बांधण्यासाठी वास्तुविशारद कंपन्यांकडून मागविलेल्या निविदांमध्ये टाटा प्रोजेक्ट्सच्या निविदेला मान्यता देण्यात आली. संसद भवन उभारणीसाठी ९४० कोटी रुपये खर्चाचा अंदाज सीपीडब्ल्यूडीने काढला होता. यात टाटा प्रोजेक्ट्सने लार्सन अॅन्ट टुब्रो कंपनीच्या ८६५ कोटी रुपयांच्या निविदेला मागे टाकले
www.konkantoday.com