
तरीही दिवसाला रत्नागिरी एसटी विभागाला ५० लाख रुपयांचा तोटा
कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली असली तरीही दिवसाला ५० लाख रुपयांचा तोटा रत्नागिरी विभागाला सहन करावा लागत आहे. सध्या दिवसाला ३१३ गाड्या सोडण्यात येत असून यातून २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या एसटीला खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करावी लागत आहे. ऑगस्ट महिन्यापासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात येत आहे. परंतु खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com