कामथे उपजिल्हा रूग्णालयाला कोविड हॉस्पिटलचा दर्जा
कामथे चिपळूण उपजिल्हा रूग्णालयाला जिल्हा कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आहे. सिव्हिलप्रमाणेच कामथे रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून यापुढे कार्यरत राहणार असल्याची जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातून सहा व्हेंटीलेटर, चार मोठे ऑक्सिजन सिलेंडर कामथे रूग्णालयाला देण्यात आले आहेत. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील परिचारिकांकडे कामथेची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहेत. चिपळूण परिसरातील खाजगी डॉक्टरांचे कामथे उपजिल्हा रूग्णालयाला मोलाचे सहकार्य लाभत आहे. कोरोनाबाधितांची प्रकृती लवकरच सुधारावी यासाठीच कामथेला जिल्हा कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com