
एटीएम कार्डची अदलाबदल करून ३४ हजार रुपये लांबविले, खेड येथील प्रकार
खेड येथे डाक बंगला परिसरात राहणार्या समीरा अब्दुला गफूर नुरी ही महिला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेली असता मागे उभ्या असलेल्या अज्ञात इसमाने हातचलाखी करून नुरी यांचे खात्यातून ३४ हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे.
फिर्यादी समीरा नुरी या खेड शिवाजी चौकातील आय.सी.सी.आय. बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये अनोळखी इसम आला व त्याने मागे उभे राहून फिर्यादी एटीएम कार्डचे पीनकोड दाबत असताना बारकाईने लक्ष ठेवून बोलण्याच्या नादात एटीएम कार्डची अदलाबदल केली व फिर्यादीच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या पतीच्या खात्यातून चौतीस हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी खेड पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com