
शासकीय पोल्ट्रीतील कोंबड्या चोरी प्रकरण, सभापती धनश्री शिंदे यांच्याकडून अधिकारी, कर्मचार्यांची चौकशी
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीमधून सुमारे ५०० कोंबड्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकिरणाची पंचायत समितीच्या सभापती सौ. धनश्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून सोमवारी घटनास्थळी भेट देत अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी केली. जिल्हा परिषदेच्या कळंबस्ते येथील पोल्ट्रीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
www.konkantoday.com