वनविभागाला सतत चकवा देणाऱ्या मेर्वी परिसरातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाय योजना
वनविभागाला सतत चकवा देणाऱ्या
मेर्वी येथील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. अनेक उपाययोजना करूनही व पकडण्यासाठी विविध पथके आणूनही हा बिबट्या वनखात्याच्या जाळ्यात अनेक महिन्यांपासून येत नाही उलट वनखात्याची पथके माघारी फिरल्यावर बिबट्या परत ग्रामस्थांवर हल्ला करीत आहे यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते आता परत एकदा प्रयत्न करणार आहे
बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी जंगलात पुन्हा कॅमेरे आणि पिंजरा लावण्यात येणार आहे. तर कोल्हापूर येथून एक पथक येणार असून रत्नागिरीचे एक अशी दोन पथके तैनात करण्यात येणार आहे. या मार्गावर चौकी तयार करण्यात येणार आहे.
मेर्वी परिसरात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत वाढत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पुणे आणि मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पथक रत्नागिरीत दाखल झाले होते. या पथकामार्फत दिवस रात्र गस्त घालण्यात आली. या पथकामार्फत कॅमेरे लावण्ययात आले होते. परंतु यामध्ये छोटे-मोठे प्राणी दिसले परंतु बिबट्याचे दर्शन झाले नाही. तब्बल आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पथक माघारी फिरताच पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती
www.konkantoday.com