
राज्यकर्ते म्हणून ट्रॅफिक पोलिसांना सूचना करा नामदार उदय सामंत यांना माजी सरपंच संतोष सावंत यांचे साकडे
राज्यकर्ते म्हणून ट्रॅफिक पोलिसांना सूचना करा असे नामदार उदय सामंत यांना नाचणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सामाजिक नेते संतोष सावंत यांनी साकडे घातले आहे
मा. उदयजी सामंतसाहेब,
आपल्याला एक कळकळीची विनंती आहे रत्नागिरी शहरातील ट्राफिक पोलीसांना राज्यकर्ते म्हणून तुम्ही काही सूचना द्याव्यात ही विनंती आहे शहर ते कारवांची वाडी ईथपर्यंत दूचाकीस्वाराला हेल्मेट सक्ती करू नये त्यापेक्षा लावलेल्या कॅमेराचा उपयोग स्पिड लिमीट, पार्किंग, क्राॅसींग याकरीता व्हावा कोरोनाच्या या काळात मास्क लावूनच बाहेर पडायच आहे बाजार करताना हेलमेट संभाळत बसणे जड जाते गाडीवर ठेवल तर चोरीला जाते गाडीत ठेवल तर सामान रहात नाही बेदरकारपणे गाड़ी चालविणार्यांना मात्र दंड शिक्षा नक्की करा सुरक्षित असल तरी त्रासदायक हेलमेट सक्ती आहे आणि ट्राफिक पोलीस फक्त जनतेला दंड करण्यासाठीच नाहीत याची जाणीव करून द्या एकाच ठिकाणी चार-पांच पोलीस ठेवण्यापेक्षा साळवी स्टाॅप ते सावरकर म्हणजे साळवी स्टाॅप दोन पोलीस ,मारूती मंदीर उद्यमनगर झाडाखाली तीन पोलीस करमरकर हाॅस्पिटल एक पोलीस माळनाका दोन पोलीस , जयस्तंभावर कलेक्टर आॅफिस दोन पोलीस श्री झेराॅक्स दोन पोलीस ,एसटी स्टॅडवर ,रामनाका, गोखले नाका ,सावरकर चौक याठिकाणी एकेक पोलीस असणे आवश्यक आहे त्यालाच वहातूक नियंत्रण समजले जाते शहरात ज्याप्रमाणे गाड्या लावल्या गेल्यावर फोटो काढून दंडात्मक कार्रवाई केली जाते त्याचप्रकारे शहरामधे फळांच्या गाड्या लावलेल्या दिसल्या तर त्याचे फोटो काढून ते वहातूक पोलीस निरिक्षकांकडे पाठविण्याची सुविधा करावी व त्याचा दंड तिथे ड्यूटीवर असणार्या पोलींसांकडून वसूल करावा म्हणजे जनतेलाही सोयीस्कर जाईल. शहारात कॅमेर्यांची सुविधा केलेबद्दल वहातूक विभागाचे अभिनंदन आहे परंतु नागरिकांच्या समस्या व अडचणी समजून घेणे गरजेचे आहे व याबाबत नामदार उदय सामंत यांनी लक्ष घालावे असेही सावंत यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com
