रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून कोकण विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी समर्थकांचे कॉंग्रेसचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना निवेदन
नाणार परिसरासह कोकण विकासाला चालना देणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या संख्येने शेतकरी जागा देण्यास तयार आहेत. प्रकल्पाला समर्थनही मोठे आहे. मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या प्रकल्प समर्थकांची बाजू शासनासह मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचू दिली जात नाही, अशी खंत रिफायनरी समर्थक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
समर्थकांची बाजू कॉंग्रेसश्रेष्ठींच्या माध्यमातून पोहचवावी आणि रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून कोकण विकासाचे स्वप्न साकार व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या वेळी रिफायनरी प्रकल्पाला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
www.konkantoday.com