
रत्नागिरी तालुक्यात राष्ट्रवादीच्या जुन्या नव्यांना एकत्र आणून ताकद वाढविणार- नूतन तालुकाध्यक्ष नाना मयेकर
रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढवताना पक्षाच्या मजबुतीकरणावर भर देण्यात येणार असल्याच ग्वाही नूतन तालुकाध्यक्ष दिलीप उर्फ नाना मयेकर यांनी दिली.
पक्षाच्या सर्व नेत्यांनी पुन्हा माझ्यावर तालुकाध्यक्ष पदाची आव्हानात्मक जबाबदारी सोपविली आहे. सर्व नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविताना जुन्या, नव्यांना एकत्र आणण्याचा निर्धार श्री. मयेकर यांनी व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्ताधारी असून त्यात राष्ट्रवादीचा देखील समावेश आहे. ग्रामीण, शहरी भागातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शासनाकडे पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. आंदोलने न करता सर्व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com