
मुंबईतील इन्फिगो आय केअर या नेत्रविषयक रुग्णालयांची साखळी निर्माण करणाऱ्या संस्थेचे रत्नागिरीत सुसज्ज रुग्णालय सुरू
मुंबईतील इन्फिगो आय केअर या नेत्रविषयक रुग्णालयांची साखळी निर्माण करणाऱ्या संस्थेने डोळ्यांच्या विविध व गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने निदान , उपचार व शस्त्रक्रिया करून देणारे सुसज्ज हॉस्पिटल दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून साळवी स्टॉप रत्नागिरी येथे सुरु केले आहे .
इन्फिगो आय केअर या संस्थेची मुंबईमध्ये वाशी , दादर , माहीम , बोरीवली , भाईंदर , विरार , पालघर , बोईसर येथे सुसज्ज अशी डोळ्यांची हॉस्पिटल्स कार्यरत आहेत
किनारी भागातील नागरिकांमध्ये डोळ्याच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. अनेक वेळा योग्य उपचार होत नसल्यामुळे आजार बळावतो. यासाठी योग्य वेळेत निदान व उपचार होणे आवश्यक आहे. मोतीबिंदू वगळता डोळ्याच्या अन्य आजारांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. इन्फिगो आय केअरमध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे खात्रीशीर उपाय होवू शकतात. येथील जनतेला कमीत कमी खर्चात उपचार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले. तर चिपळूण येथेही सेंटर सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील इन्फिगो आय केअर या नेत्रविषयक रूग्णालयाची साखळी निर्माण करणार्या संस्थेने डोळ्यांच्या विविध व गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने निदान, उपचार व शस्त्रक्रिया करून देणारे सुसज्ज हॉस्पिटल १ सप्टेंबरपासून रत्नागिरीतील साळवी स्टॉप रत्नागिरी येथे सुरू केले आहे.
www.konkantoday.com
