
शिवसेनेला मतदान करा, निधीची कमतरता भासणार नाही -आ. राजन साळवी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. शिवसेना संघटना जो उमेदवार देईल त्याला शंभर टक्के मतदान करा. मी प्रलंबित विकास कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आवाहन आ. राजन साळवी यांनी येरवडे येथे केले. अतिवृष्टी कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या हनुमानवाी ते सावंतवाडी रस्त्याच्या दुरूस्ती कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. राजन साळवी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
www.konkantoday.com