
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट मधील कलाकृती पाहून अजित पवार भारावले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारच्या दौर्यावेळी सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्रशिल्प कला महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी येथील कलाकृती पाहून ते भारावले. त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.कार्यकर्ता मेळाव्यासाठी सावर्डे येथे आले असता दिलेल्या भेटीत महाविद्यालयातील विविध विभागांची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहिल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने मंत्रमुग्ध झालेल्या पवार यांनी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक मिळवला आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट ही संस्था ग्रामीण भागात असूनही उत्कृष्ट दर्जाचे कलाशिल्प देत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांची समर्पित कृती यामुळे महाविद्यालय वेगळी ओळख निर्माण करत आहे हे कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी चित्र भेट देवून पवार यांचा सत्कार केला. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.www.konkantoday.com