पोलीस प्रशासनाने उभारलेल्या मारुती मंदिर येथील अत्याधुनिक ३६०डिग्रीमध्ये फिरणाऱ्या कॅमेरा यंत्रणेचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते शुभारंभ
शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते.
www.konkantoday.com