
चिपळूण पूर्व विभागात लवकरच अँटीजेन टेस्ट होणार
चिपळूण तालुक्यात पूर्व विभागातील अलोरे, सती, पिंपळी येथील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील अशांसाठी लवकरच पाच दिवसीय अँटीजेन टेस्ट कॅम्प आयोजित केला जाणार आहे. तरी या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सती चिंचघरी विद्यालयामध्ये पिंपळी, सती, खेर्डी आदी पूर्व भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
www.konkantoday.com